Sunday, October 26, 2014

डॉ. प्रकाश बाबा आमटे

     डॉक्टर प्रकाश बाबा आमटे चित्रपट पहिला आणि खरच जाणवले ह्या सेवाकार्यापुढे आपण कुठेच नाही . हेमलकसा सारख्या आदिवासी प्रांतात बायको सोबत आणि मोजक्या सहकार्यांसोबत त्यांनी उभारलेला  'लोक बिरादरी प्रकल्प ' हा उत्कृष्ट प्रकल्प आहे . सदर चित्रपटामध्ये नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या कार्याला न्याय दिला आहे .
     प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातीलहेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णीमोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे.

आदिवासी जनता शहरी जनते च्या बरीच मागे असते . त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या हि लोक फारच मागे पडलेली असतात . अशा लोकांना नित शिकवून त्यांचा विकास करणे हि खरच साधारण  नाही . डॉक्टर  प्रकाश त्यांच्या पत्नी सोबत इथे राहायला आले आणि तेथील भयावह परिस्थिती पाहून हल्वळून गेले . तेथील स्त्रियांना मासिक पाळी ची माहिती नसते , सुर्य -  चंद्र - ग्रहण - रोग यांबद्दल बरच गैरसमज असतात . देवाला लहान बाळाचा  बळी  दिल्यानेच एखादा रोगी सुधरु शकतो वगैरे गैरसमज होते . जन्माला आलेल्या बाळाची नाळ त्या आदिवासी बाया दगडाने ठेचून तोडत असत . हे सारे बदलने सोपे नव्हते . पण अशक्य सुद्धा नव्हते आणि तेच ह्या नवरा बायकोने करून दाखवले . 

  डॉक्टर मंदाकिनी यांनी पत्नीधर्म सांभाळत समाजसेवेतही कार्य केले .