Sunday, September 27, 2015

ऋणज्ञापक स्तोत्र

ऋणज्ञापक स्तोत्र

अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो ।।
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो ।।

चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरलो
शेवटी मानवाच्या जन्मासी आलो
तरीही मी तुझ्या कृपेस पात्र झालो

अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो ।।
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो ।।


भावार्थ : सद्गुरु अनिरुद्ध म्हणजे साक्षात परमात्मा ! मोठ्या आईचा पुत्र ! ज्याला आपण राम , कृष्ण म्हणून जाणतो तोच हा अनिरुद्ध बनून आपल्या समोर उभा आहे . ह्याला पाहणे ह्याचा आवाज ऐकणे हे सुद्धा महद भाग्याचे आहे . असा हा बाप्पा आपल्याला सहजपणे लाभला आहे , हे त्याच आपल्यावरचे
अकारण कारुण्यच !!
  मानव जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरल्यानंतर प्राप्त होतो , म्हणजे ह्याचा अर्थ हा जन्म किती महत्वाचा आहे आणि आपण सहज timepass जो करुन  किती वेळ वाया घालवतो हे आपल्या ध्यानात येईल. बापूंच्या अनंत कृपेमुळे आपल्याला त्यांच्या सानिध्यात हा जन्म प्राप्त झाला आहे , म्हणून हा जन्म सद्गुरूंच्या सेवेत , नामस्मरणात आणि दादांनी सांगितलेल्या उपासना न चुकता करण्यात आपले भले आहे.
हे अनिरुद्धा , मानव जन्म व तोही तुझ्या सामिप्यात दिलास म्हणून मी तुझा अनंत ऋणी झालो आहे .