_समजणार कधी_
बायको असो की Gf तिला वाटतं की तिला तिचा नवरा / BF काही समजूनच घेत नाही , त्याचवेळेला समोरच्याला ही तेच वाटत असते आणि हाच गैरसमज वाढत जाऊन जाऊन मग दोघांनाही नात्याचा जडपणा जाणवू लागतो .
मग , हे होतंच का ? आणि असं होऊच नये यासाठी करायचं काय ?
उत्तर खूप सोप्प आहे !
ह्यासर्वाची सुरुवात एकमेकांना न समजून घेतल्याने होते ,
आणि एकमेकांना समजून न घेण्याची सुरुवात , अहंकारातून होते . "मी का कमीपणा घेऊ " ह्या अहंकारातून अनेक वाद जन्म घेतात .
जेव्हा , एक निर्णय घ्यायचा असतो आणि दोघांची दोन मत असतात , तेव्हा दोन्ही गोष्टीमधून निघणारा मध्यममार्ग काढावा , ज्यामुळे दोघांच्या Wish पूर्ण होतील .
हा मध्यममार्ग , काढण्यासाठी एकच भाव दोघांनी मनात रुजवून ठेवायचा
" ही / हा माझा / माझी आहे "
बस ! हा एक भाव ! एकमेकांना समजून घेणं असो की सर्व गैरसमज , नात्याला त्रासदायक ठरू पाहणाऱ्या सर्व गोष्टींचा नाश करते .
दोघांनी " ही / हा माझा / माझी आहे "
हा भाव मनात ठसवून , प्रेम करू लागा मग बघा , नातं तुटण्याची कधी वेळेचं येणार नाही .
-राहुलसिंह 1364