Saturday, December 9, 2017

श्री गायत्री योगा वर्ग # भाग १

     योगामुळे मानवाचा सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास म्हणजे बौद्धिक, नैतिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व शारीरिक विकास होतो. यामुळे आरोग्य निरोगी व चैतन्यशील बनते. योगाच्या सानिध्याने मानवाच्या दैनंदिन क्रिया सुधारून अंतर व बाह्य असे बदल दिसून येतात. विविध आसने व प्राणायाम याद्वारे संपूर्ण जीवन बदलून जाऊ शकते. यामुळे जीवन आंनदी – उत्साही व निरोगी बनविण्यासाठी २१ व्या शतकात योगाची नितांत आवश्यकता आहे.

   योग म्हटला कि साधारणत: आसनांचीच कल्पना आपल्यासमोर उभी राहते. परंतु आसने योगाचा एक अष्टमांश भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान,धारणा, आणि समाधी ही योगाची अष्ट अंगे होत. या आठ अंगापैकी एक अंग आसने होत. आसनांमुळे शरीर निरोगी आणि दीर्घजीवी बनू शकते. 

    योगसाधनेची वाटचाल मात्र आत्माज्ञानाकडे असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच आसनांना ‘आसन’ हे अत्यंत सुयोग्य नाव दिले आहे. ‘आ’ म्हणजे प्राप्त झालेले सर्व घेऊन ‘सन’ म्हणजे पलीकडे जाणे होय. पलीकडे कोठे ? तर प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, व शेवटी समाधी अवस्था होय. परंतु या सर्व उच्च उच्चतर अवस्था प्राप्त करण्याकरिता प्रथम सूक्ष्म शरीररूप उपकरणांची अतिशय आवश्यकता असते. शरीराचे माध्यमातून आपण वरील सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो. म्हणून शास्त्र सांगते – ‘ शरीरं आद्य खलु धर्म साधनम’ !

      आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषी अध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञान विज्ञानांतील गहन तत्वे समाजासमोर ठेवीत असत. वेदांमध्ये बरेच ज्ञान विज्ञान साठविले आहे. परंतु दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात. वेदातील सर्व ज्ञानविज्ञान ऋषींनी सखोल चिंतनाद्वारेच प्राप्त केले. आजचे थोर वैज्ञानिक सुद्धा तसल्या सखोल चिंतनाचा उपयोग करून नवनवे शोध लावतात आणि मानवी जीवन सुखी व समृध्द करण्याचा अहोरात्र प्रयत्न करतात. वैज्ञानिकांच्या मनाची एकाग्रता अथवा चिंतनाची क्षमता सर्वांमध्ये जन्मतः असू शकत नाही त्याकरिता आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, इत्यादी योग्य मार्गाने आपण आपल्या मनाची एकाग्रता व सखोल चिंतनाची क्षमता वाढवू शकतो. योगसाधना एक प्रकारचे प्रशिक्षण आहे. आजकाल जीवनाच्या प्रत्येक कक्षेत प्रशिक्षणाचे महत्व वाढत आहे. मनाच्या एकाग्रतेची व सखोल चिंतनाची गुरुकिल्ली ध्यान प्रक्रियेत आहे. ध्यानामुळे मन अतिशय एकाग्र बनत असते. असल्या एकाग्र मनाचा उपयोग आपण आपल्या जीवनातील कोणत्याही कामाकरिता करून त्यात लवकर उन्नत्ती व पूर्णता प्राप्त करू शकतो.

   
चला तर मग आता आपण योगसाधना दैनंदिन जीवनात कशी आणता येईल ते पाहू .

   १. रोज सकाळी उठल्यावर डोळे लगेच न उघडता , बसल्या बसल्याच , दोन्ही हात मुस्लिम बांधव प्रार्थना करतात तसे हात करून खालील प्रार्थना म्हणावी .

कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वति ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥

असं म्हणून दोन्ही हात एकमेकांवर जोरात चोळावेत आणि लगेच डोळ्यांवर ठेवावे आणि मग हळूहळू डोळे उघडावे .
 
  अशा दिवसाच्या प्रारंभीच केलेल्या प्रार्थनेमुळे , संपूर्ण दिवस सुंदरच जातो .

२. त्यानंतर , ब्रश करून मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या .
   ह्यामुळे , घशाचे कोणतेही विकार होत नाहीत .
    त्यानंतर , बसून पाणी प्यावे .

ह्या क्रियेस , ' जलक्रिया ' असे म्हणतात .

३. नेत्रस्नान

  तोंडात पाणी घ्यावे . पाणी पिऊ नये . त्यानंतर , ओणवे उभे राहून डोळे उघडे ठेवुन , हलकेच डोळ्यांवर पाणी मारावे . मग तोंडातील पाणी टाकावं

    असे 30 Sec कमीतकमी वेळ करावे .
 
असे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना करावे .
नेत्रस्नान , सकाळी केल्याने झोप उडून जाते . डोळे साफ होतात .

नेत्रस्नान , रात्री केल्याने छान झोप लागते . 

डोळ्यांचा नंबर वाढत नाही .

नेत्रस्नान कोणी करू नये ?

  ज्यांना डोळ्यांचा विकार आहे , ज्यांचे डोळ्यांचे कोणतेही Operation झाले आहे , ज्यांच्या डोळ्यात फुल पडले आहे , ज्यांना डोळे आले आहेत .

४ .  गणेशक्रिया आणि अश्विनिमुद्रा

  अनेकांना आजकाल Piles आणि फिशर चा त्रास होत असल्याचे आपल्याला माहिती असेलच . मलविसर्जन करताना जोर धरून केल्याने गुदद्वाराजवळ जखम होते आणि पुढे जाऊन, ह्याचेच परिवर्तन Piles मध्ये होते .
   हे होऊ नये ह्यासाठीच , किमान चार दिवस साजूक तुप / Vaseline /खोबरेल तेल असे Lubricant बोटाने गुदद्वाराच्या आत घुसवावे .
  आणि अश्विनिमुद्रा करावी .
म्हणजे , घोडा ज्याप्रमाणे मलविसर्जन केल्यावर गुदद्वार आतबाहेर करतो , तसेच आपणही करावे.

   ह्यामुळे , खूप चांगला फायदा होतो , मलविसर्जन करताना रक्त पडत असेल तर ते ही थांबते , त्याठिकाणी होणारी जळजळ थांबते आणि त्यासंदर्भात असलेलं आजार लांबच राहतात .

४ . जल धौती

पोटाचेच नव्हे तर संपुर्ण शरीराचे सर्व आजार दूर करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी  जल धौती सारखा जबरदस्त उपाय आपल्याला दिला आहे .

  ही मुळात , वमन क्रिया आहे .
ह्यात ,
मीठ घुसळलेले पाणी घ्यावे .
खो- खो खेळताना बसतो तसे बसावे आणि आकंठ पाणी प्यावे .
  त्यानंतर , हाताची तीन बोटे पडजीभेवर ठेवून दाबावी , जेणेकरून उलटी येईल .
   आणि उलटी करावी .

वमन क्रिया 15 दिवस क्रमाने करावी . वात , पित्त , कफ हे तीनही प्रकृती तुन होणारे सर्व आजार बरे होतात . आणि पोट साफ राहते .
डोक्याला , पायाला येणाऱ्या मुंग्या थांबतात .

फ्रेश वाटते.

   जलधौती कोणी करू नये ?

  ज्यांना High Bp आहे , हार्ट संबंधित कोणताही आजार असेल , ज्यांना वाकल्यावर चक्कर येते अशांनी .

जल धौती केल्यावर कदाचित जर रक्त आले तर जल धौती थांबवावी .

जल धौती केल्यानंतर कदाचित पातळ संडास होण्याची शक्यता असते परंतु , ते अतिरिक्त पाण्यामुळे च होते त्यामुळे Temperorary च असते. घाबरण्याचे कारण नाही .

# ज्या दिवशी धौती करणार नाही त्यादिवशी ब्रश केल्यावर - मिठाच्या पाण्याच्या गुळण्या झाल्यावर - 5 लसूण पाकळ्या खाव्या आणि त्यावर कोमट पाणी बसून प्यावे.

५. वज्रासन

वज्राचा अर्थ बलवान असा आहे. इंद्राच्या एका शस्त्राचे नावही वज्र आहे. 

(1) दोनही पायांचे गुडघे वाकवून पायांच्या टाचांवर बसा. दोन्ही गुडघे एकमेकांना टेकलेल्या अवस्थेत हवेत. या पद्धतीला योगासन म्हणतात.
(2)या स्थितीमध्ये दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागतील याची काळजी घ्यावी.
(3)पार्श्वभाग उलट्या पावलांवर व्यवस्थित पक्का करावा.ओटीपोटाचा भाग थोडा पुढे करावा.पाठीचा कणा ताठ ठेवावा.
(4)हातांचे तळवे गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांजवळ मांडीवर ठेवावेत.पोट व हाताचे स्नायू ढिले सोडावेत.(5)डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटाव्यात.लक्ष श्वासावर केंद्रित करावे.हीच वज्रासनाची
अंतिश्वासस्थिती:अशा सुखकारक आसनामध्ये श्वासोच्छ्वास आपोआप शांत,सावकाश व दीर्घ होतो.त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते.वज्रासन हे ध्यानासाठी योग्य आसन आहे

आसन सोडताना:डोळे उघडून तळहात मांड्यांवरून खाली जमिनीवर ठेवावेत.दोन्ही पाय एकेक करून सरळ करावेत.

लाभ:योगाभ्यासासाठी योग्य अशी शांत,एकाग्र मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती वज्रासनामुळे लवकर साध्य होते.म्हणून सुरुवातीस हे आसन केल्यामुळे पुढील योगाभ्यास उत्तम होतो.ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते.जननेंद्रियांचे आरोग्य चांगले राहते.पाठीच्या कण्यातील दोष नष्ट होतात.

वज्रासनात बसल्याने शरीर बळकट आणि स्थिर बनते. यासाठी याला वज्रासन असे म्हणतात.

घ्यावयाची काळजी :गुडघेदुखी असणार्‍यांनी हे आसन करू नये.

वज्रासनाचे फायदे :या आसनाने शरीर बळकट आणि स्थिर बनते. याने पाठीचे हाडे आणि खांदा सरळ होतात. या आसनाने श्वासाची गती मंद झाल्याने आयुष्य वाढते. हे एकमेव आसन जेवण झाल्यानंतरही करू शकतात. याने जेवण पचण्यास मदत होते. या आसनाने पायाचे सांधे बळकट बनतात. या आसनाच्या सरावामुळे विशेषत: जननेंद्रियावर व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो.

६. कपालभाती

कपाल =  कपाळ; भाती= ओजस्वी;

आपल्या शरीरातील ८०% विषांत द्रव्ये ही श्र्वासावाटे बाहेर टाकली जातात. कपालभातीचा सराव करते वेळी  शरीरातील सर्व संस्थांची सफाई / प्रक्षालन / शोधन होते. आणि ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचं प्रतिकच म्हणता येईल. कपालभातीचा शब्दशः अर्थ ओजस्वी कपाळ असा होतो आणि या प्राणायामच्या नियमित सरावाने नेमके हेच होते. ही चमक बाह्यच नसून बुद्धीला तल्लख व शुद्ध करणारी आहे.

कपालभाती प्राणायाम कसा करावा?

१. सुखासनात बसावे, पाठीचा कणा ताठ ठेवावा .
२. एकदा पूरक ( श्वास घेणे ) करावें .
३. त्यानंतर , रेचक ( श्वास सोडणे ) करावे.
४. पुन्हा पूरक करावे .
५. आता , डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी दाबावी .
६. जोरात रेचक करावे . पोटाच्या हालचालींवर लक्ष देऊ नये .
७. हे रेचक करताना हलकेच पूरक करत राहावे .
८. श्वास संपल्यावर 5 सेकंद शांत राहावे .
९. हलकेच , दीर्घ पूरक करावे .
१०. दीर्घ रेचक करावे .
११. हीच , क्रिया उजव्या नाकपुडी ने Repeat करावी .
१२. त्यानंतर , दोन्ही नाकपुड्या खुल्या ठेवून करावी .

लक्षात असावे :
नेहमी उजव्या नाकपुडी पासूनच सुरवात करावी .
   उजवी नाकपुडी हे सूर्य नाडी आणि डावी नाकपुडी चंद्र नाडी दर्शवते .
   सूर्य उष्णता निर्माण करतो तर चंद्र शीतलता निर्माण करतो .
   चंद्र नाडी ने आधी कपालभाती करून नंतर सूर्य नाडी केल्यास , शरीरात उष्णता राहू शकते .
    क्रमाने , कपालभाती केल्यास , चंद्रनाडी हीच शरीरातील उष्णता शांत करते.

साधारण जीवनात , नीट पाहिले असल्यास असे दिसून येते की आपण दोन्ही नाकपुड्यानी समांतर श्वास घेत नाही . दोन्ही नाकपुड्यातून जे ' सहज रेचक ' होते ते समान होत नाही .

  भगवंताच्या अकारण कारुण्यामुळे , रोज फक्त ब्राम्हमुहूर्ती हा श्वास दोन्ही नाकपुड्यातून समांतर होत असतो आणि म्हणूनच , कपालभाती हा योग , ब्राम्हमुहूर्ती करणे सर्वात जास्त फायदेमंद होय !

कपाल भातीने होणारे लाभ:

चयापचयाची (म्हणजेच  खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याची गती) वाढते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.शरीरातील सूक्ष्म नाड्यांची शुद्धी होते.पोटाचे स्नायू उत्तेजित होतात ज्याचा लाभ मधुमेहींना होतो.रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्याची कांती वाढते.पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते, पोशाक तत्वांचं शरीरात परिपाक जलद गतीने होतो.पोट सुडौल राहते.मज्जासंस्था उर्जित होते व मेंदूच्या पेशींना चालना मिळते.मन शांत हलके होते.

कपालभाती कोणी करू नये?

हृदयविकार असेल, पेस-मेकर बसवला असेल किंवा स्टेन्ट्स बसवले असतील, स्लिप-डिस्क मुळे पाठदुखीचा त्रास असेल, पोटाचे ऑपरेशन झालेले असेल, फेफरे येत असेल किंवा हर्नियाचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने कपालभाती करू नये.गरोदर महिलांनी किंवा मासिक पाळी चालू असल्यास काल्पालभाती करू नये कारण ह्या प्रकियेत ओटीपोटाचे स्नायू पिळवटून निघतात.उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या  व्यक्तीने योग तज्ञाच्या  मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करावा.

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने *हार्टमधले ब्लोकेज* पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.

कपालभाती करणार्याची हार्टची *कार्यक्षमता* वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंक्शन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं *हार्ट कधीच बन्द* पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
    
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची *गाठ डीझाॕल्व्ह* होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विरघळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं *कोलेस्टेरोल* कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला डॉक्टर सांगतो.
   
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने *हीमोग्लोबिन* एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात १६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.

कपाभातिमुळे *महिलांच्या पिरिएड्सच्या* सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.

कपाभातिमुळे *थायरॉइडचे* आजार एका महिन्यात *गायब* होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. *स्ट्रेस हामोंस* गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

*किती विशेष आहे पहा.*

कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या *करेक्ट* होतात. *बैलन्स* होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी *अंडरवेट* रहात नाही नी कुणी *ओव्हरवेट* रहात नाही. दिवसाला एक एक *किलो वजन कमी* होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं *ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.*
    
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे *त्वचारोग* बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स *औषध म्हणून स्टीरॉयड* देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

*कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो*. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे *हाडांचे आजार कायमचे बरे होतात.*

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी *कपालभाती नियमित केलि पाहिजे.*

विचार करा *प्राणायामामधली* एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.🙏😀😀🙏