Friday, April 13, 2018

आपलं घर ~ स्तंभ २ रा ~ स्वयंपाकघर

   प्रत्येक घराचा अविभाज्य भाग म्हणजे स्वयंपाक घर ! पूर्वी च्या जमान्यात , फक्त स्त्रियांचीच मक्तेदारी असलेल्या ह्या जागी , आता पुरुषही स्त्रियांची बरोबरी करू लागले आहेत .
   नवीन लग्न करून , जेव्हा एक सून म्हणून मुलगी गृहप्रवेश करते तेव्हा , त्याच वेळेस त्या घरच्या स्वयंपाक घराची आधील इतके वर्षे , जबाबदारी सांभाळत असलेली तिची सासू आपसूकच Retire होते . आता, Kitchen सांभाळायची जबाबदारी नव्या सुनेची ! कोणतीही स्त्री , ही जबाबदारी आनंदाने स्वीकारते , कारण त्यात तिलाही आनंद मिळतच असतो . हळूहळू संसार पुढे जाऊ लागतो . स्वयंपाकघरात छान छान खमंग नवनवीन पदार्थ शिजू लागतात . सुंदर स्वयंपाक करणारी बायको म्हटल्यावर , आपसूकच , नवऱ्याच्या अंगावर मूठभर मांस चढत असतं . ऑफिस मध्ये , ही भाजी माझ्या बायकोने केली आहे , हे सांगायला जे धाडस लागतं ना , ते बायकोनेच तिच्या हातच्या चवीने , नवऱ्याला द्यायचे असते .
नवऱ्याने फोन करून , आज काहीतरी मस्त बनव ना जेवणाला , अस सांगावं आणि बायकोने तिच्या लाडोबा नवऱ्यासाठी त्याच्या आवडीची काजूची रस्सा भाजी / कुरकुरीत चिकन टिक्की बनवावी आणि त्याला ' अन्नपूर्णा बायकोचे ' समाधान द्यावे , हे पण प्रेमच तर आहे .
   कधीकधी , ह्याच स्वयंपाक घरात - नवऱ्यासाठी Surprise डबा भरला जातो , जो ऑफिस ला गेल्यावर  नवऱ्याला सुखद धक्का देतो .
    कालांतराने , मुलं होतात -

Monday, April 9, 2018

आपलं घर ~ स्थंभ १ ला ~ सकाळ

असं म्हणतात की १०० वर्षे निरोगी जगण्याचं रहस्य म्हणजे - सकाळी लवकर उठणे .  
   पण हल्लीच्या जमान्यात लवकर उठणे म्हणजे महान आश्चर्य च समजले जाते . मुळात , हे फार चुकीचे आहे . सकाळी लवकर उठल्याने शारीरिक फायदा तर होतोच पण त्याचप्रमाणे मानसीक आणि आध्यत्मिक फायदा देखील होतोच .
    नवीन लग्न करून घरी आलेली सून - कदाचित घरच्या लवकर उठण्याच्या सवयीशी जाणकार नसते आणि म्हणून घरात लवकर सारे उठतात आणि मागून ही ! असे होऊ देऊ नये ! सकाळी लवकर उठण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे . रात्री झोपण्यास उशीर जरी झाला असेल , तरी त्यातल्यात्यात वेळेत उठून आपली काम उरकावी आणि मग आराम करावा . वेळेची काम वेळीच करायची सवय आपण प्रत्येकाने लावली ना , तर काम उरून राहत नाहीत .
   सकाळी लवकर उठल्याने दिवस मोठा होतो , परिणामी आपल्याला कामं करण्यास बराच वेळ मिळतो . डॉ. अनिरुद्ध यांनी सांगितल्या प्रमाणे सामान्य व्यक्तीला ६ तास झोप पुरेशी असते. आणि त्या योगे , रात्री 10 ला झोपल्यास पहाटे 4 ला उठणे शक्य आहे !
रात्री 11 ला झोपल्यास पहाटे 5 ला उठणे शक्य आहे !
रात्री 12 ला झोपल्यास पहाटे 6 ला उठणे शक्य आहे !
रात्री 01 ला झोपल्यास पहाटे 7 ला उठणे शक्य आहे !

सासू-सुनांच्या नात्यात दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवावे. दुसऱ्याच्या मताचा आदर करून आपले मत मांडावे. 

पण आपल्या मतांचा आग्रह लादू नये. स्वतः च्या मुलीला सासरी त्रास झाला की आम्ही देवाला विचारतो , अस का केलंस रे देवा ?
पण तुम्ही तुमच्या सुनेला कसं वागवता ; त्याचा विचार करा . माझ्या सुनेने माझ्या भोवती सकाळ - संध्याकाळ नाचलच पाहिजे पण माझ्या मुलीला सासूने चहा कर म्हणून सांगितलेले चालणार नाही , हा कोणता न्याय ?
सासू-सुनांच्या नात्याबद्दल शेजारीण, नातेवाईक, मैत्रीण, नोकर यांच्याशी चर्चा केल्यास लोकांना गॉसिपचा विषय मिळतो. लोक रडून काढून घेतात आणि हसून जगाला सांगतात. त्यांना नाते तुटलेले पाहून मजा येऊ शकते. त्यापेक्षा ‘मला या गोष्टींचा त्रास होतो’, ‘याचे वाईट वाटते’, ‘आपण यापेक्षा तसे केले तर?’ अशा 
सौम्य वाक्यांचा वापर करावा. ती कशी वाईट म्हणून मी कशी चांगली ही स्पर्धा या नात्यात नसावी. प्रेम ही अशी भावना आहे की गुणांबरोबर दोषांवरही 
प्रेम केले तर ते माणूस आपलेसे होते. 
 
  लग्नांनंतर नवऱ्याचं कसं होत ? आतापर्यंत आईचे आपण गुणगान गात असतो पण बायको आल्यानंतर आई कशी चुकीची आहे , हे आम्हाला एकाच क्षणात पटायला लागतं . आईला खुश ठेवण्यासाठी बायकोशी खोटं बोलायचं व बायकोला खुश ठेवण्यासाठी आईशी खोटं बोलायचं आणि हे दोन्ही करताना स्वतःशी खोटं बोलायचं , की मी किती चांगला वागतोय . पुरुषांना बायका हसतात , पण पुरुषांवर ही वेळ आणत तरी कोण ? बायकाच आणतात . पण तुम्ही जर खंबीर असाल तर ही वेळ तुमच्यावर येणारच नाही , हे लक्षात ठेवा .

    नवीन नवीन लग्न झाल्यावर , घरातल्या मंडळींनी ही लवकर उठवेच असा हट्ट , नवीन सुनेवर न करता - घरची पद्धती आणि लवकर उठण्याचे महत्व तिला समजावून द्यावे आणि तिला लवकर उठण्याची सवय करण्यासाठी वेळ द्यावा .
घरातल्या मंडळींनीही समजून घ्यावे , की कोणतीही नवीन गोष्ट आत्मसात करायला वेळ लागतोच तसाच तिला हळूहळू प्रयास करू द्यावा . व सुनेने सुद्धा लवकर उठण्याचा प्रयास करावा. सकाळी लवकर उठून Walk / प्राणायाम करून आपण स्वतः चे आरोग्य सुधारत असतो .
कालांतराने हीच , सवय येणाऱ्या पिढीला लागत असते ह्याचे भान राखावे .

- राहुल गुरव
ठाणे