Thursday, August 9, 2018

आपल्या घरातल्या गमती .....

*रोज सकाळी 6:30 ला निदान उठतात.

*केर काढून झाल्यावर , केराचा डबा दाराबाहेर ठेवला जातो , झाडूवाला तो रिकामा करतो .

*लादिवर केर काढला की mop मारला जातो.

*शो केस वर , फ्रिज वर , कपाटावर फडका मारून साफ केला जातो.

*देवाची भांडी घासून साफ करून ठेवली जातात. देवाची भांडी साबणाचे थेंब टाकून हातानेच घासले जातात.

*गुळण्या व पाणी ( अळशी पावडर टाकून ) प्याले जाते.

* लसूण पाकळ्या 3 ते 5 खाव्या.

*अंघोळ करताना त्रिविक्रम जल तर Compulsory

*अंघोळ नंतर देवाला नमस्कार करून शताक्षी प्रसादम खाल्ला जातो.

* रात्री भिजत ठेवलेले बदाम आणि सुकामेवा खातो .

* शेरू साठी 1 डबा भात व चिकन / दुध नाष्टा साठी लागते. शेरू च चिकन कायम एका टोपात धुतलेले चिकन त्यात पाणी + हळद टाकून उकळी आणून दिले जाते.  शेरू चा तांदूळ व आपला तांदूळ वेगळा आहे.

* तुळशीच्या वर कपडे सुकत घालू नये

* आई आणि घरातील मोठ्या मंडळींना आदराने हाक मारणे हे स्त्रीचे सौंदर्य अजून वाढवते .

* चार चौघात बसल्यावर नीट बसणे , कारण प्रत्येक जण हा निरीक्षण करायलाच बसला असतो .

* सायंकाळी सहा नंतर म्हणजे दिवा बत्तीच्या आधी गृहलक्ष्मी ने घरी असावे , असा प्रयास असावा.

* भांडी न घासता रात्री झोपी जाणे हे अलक्ष्मी ला आमंत्रण आहे . किंबहुना , मोरीत भांडी पडली रे पडली लगेच आपापली घासून टाकावी.

* वडीलधारी मंडळी भेटताच , त्यांना वाकून नमस्कार करावा , हे उचित संस्कार आहेत .

* जेवल्यावर झाडू मारणे .

No comments:

Post a Comment