सद्गुरू हा समुद्रासारखा अथांग असतो. त्यात आपल्याला च सामावून जायचे असते . सद्गुरू पादांबुजाला स्पर्श करताच तामसी वृत्तीचा नाश होऊन कैवल्य जागृत होते . मन संपूर्ण पणें निष्कृतीमय होण्यासाठी सद्गुरुंचे मानसपूजा नियमित करणे जरुरी आहे. मानसपूजा ही अत्यंत श्रेष्ठ असून त्यात मानसिकरीत्या असमसाहस प्रेमाने व्योमकेश त्रिविक्रम यास पाचारण करायचे . त्रिविक्रम भगवंताने च हे विश्व सृजिले आहे.
त्रिविक्रम हाच माझा सद्गुरू आणि माझा अनिरुद्ध .
मानसपुजेत अनिरुध्द यास स्नपन करावे आणि अजीजी करावी ,
" अनिरुद्ध देवा , मला अकिंचन ठेवू नकोस. तू सर्वविद आहेस . तुला माझ्या जन्म - जन्माची सय आहे. तू अनवरत पणे माझ्यावर प्रेम करतोस . म्हणूनच , हे सद्गुरू अनिरुद्ध राया - तुझ्या ह्या आत्मजाला सदैव तुझ्या पादांबुजा वरच राहू दे -
मला अनृणी कर - माझ्यातील
वोखटेपण काढून टाक.
हे सर्व काही तू केवळ तुझ्या एका भ्रुकुटी- लाघवातच करू शकतोस.
-
साचार वानर सैनिक
फक्त बापूंचा सिंह
राहुल सिंह गुरव
२०/०४/२०२०
No comments:
Post a Comment