Friday, July 28, 2023

निसर्गाला आव्हान

 निसर्ग ही परमेश्वराने दिलेली भेट आहे . बहरलेला निसर्ग कायम मनाला सुखावत राहतो . शहरात राहणारी लोक २ दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहून आली ना , तरी त्यांना किती  फ्रेश वाटतं , हे त्यांना माहितीच आहे . निसर्ग कायम आपल्याला देत राहतो , पण जर आपणच निसर्गाला आव्हान दिले तर एकवेळ तो ही आपल्याला सोडत नाही . 

    सध्या मोठ्या प्रमाणावर चाललेली वृक्षतोड , डोंगरतोड , नदी बुझवणे अशी विघातक कामे ही मानवी विनाशाची चाहूल आहे . ग्लोबल वॉर्मिग हा ह्याचाच परिणाम आहे . बर्फ वितळू लागलाय, ह्याहून अधिक काय वाईट ! कधीही कोणत्याही वेळी पाऊस पडतो . अनियमित निसर्गचक्र , हे इतकं भयानक वास्तव अनुभवत असताना ही आपण याविरोधात का कोणी ठाम कृती घेत नाही.  निसर्ग तोडून बांधकाम चाललय , दिसले ना , तर टाका लगेच Social Media वर फोटो , व्हिडिओ ! त्यात जागेचे नाव टाका , होऊ दे viral - कळू दे जनतेला आणि तिथल्या राजकारणी व्यक्तींना की हे चुकीचे होतंय. पण जो पर्यंत आपण बोलणारच नाही , तोवर ही मनमानी अशीच चालू राहणार ! 

  

No comments:

Post a Comment