Wednesday, July 26, 2023

सिमेंटचे जंगल ...

 घोडबंदर ठाणे येथील सिमेंटचे जंगल ... 


   आज सकाळी घोडबंदर रोड वरून जाताना हिरवाई कुठेतरी हरवल्यासारही वाटली . गेल्या १० वर्षात जे सिमेंटचे जंगल वाढले आहे , त्यातून जाताना खऱ्या निसर्गप्रेमी ठाणेकराला भरून आल्यासारखे नाही वाटले तर नवलच !

   ह्याला जबाबदार बिल्डर कडून पैसेखाऊ राजकारणी आहेत . मुळात राजकारण्यांच्या हाती सत्ता असते ; ती त्यांनी सत्कारणी तेव्हाच लागते जेव्हा ते त्या अधिकाराचा वापर आपल्या जनतेला , आपल्या जमिनीला , आपल्या निसर्गाला त्याचा हक्क मिळवून देतील किंवा किमान असलेला हक्क टिकवुन ठेवतील . 

घोडबंदर च्या निसर्गाची डोळ्यांची पारणे फिटणारी निसर्ग सृष्टी अनुभवायची असेल तर त्यासाठी भर पावसाळ्यात इथे यायला हवं . अहाहा , काय निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे ! पावसाळ्यात  ठाणेकरांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनात पूर्ण रिफ्रेश व्हायचं असेल तर लगेच बाईक वरून घोडबंदर रोड वर  एक फेर फटका मारून आल्यास दिवसभराचा क्षीण गेल्याचा अनुभव येईल . 

पावसाळ्यात , तुम्ही ठाण्यावरून कासार-वडवली सोडलं की हळूहळू तुम्ही निसर्गाच्या कुशीत शिरू लागता . पण न संपणाऱ्या लहान मोठी इमारती , त्यांची बांधकाम , मेट्रो ची बांधकाम इत्यादी ह्या पावसाळ्यात डोळ्यांना नकोश्या होतात , कारण ह्या सर्व गोष्टीमुळे नैसर्गिक सुंदरतेला तडा गेला आहे . पुढे जसजसं तुम्ही ओवळ्याला पोहचाल , तसतसं तुम्ही 90 % तरी निसर्ग मय झालेले असाल . 

आता इथे सरकारने खाडी शेजारीच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक कट्टा उभारला आहे आणि छान सोय सुध्दा केली आहे .  पण कितीही काहीही असलं तरी नैसर्गिक सौन्दर्य ते नैसर्गिक सौन्दर्यच !


ह्या लहानशा लेखातून मी आवाहन करत आहे , यंदाच्या वर्षी भर पावसात एकदा तरी घोडबंदर रोड ला नक्की भेट द्या . तिथे गावकऱयांनी लावलेल्या स्टॉल वर गरमागरम मॅग्गी चा आनंद नक्की घ्या . तसेच , झणझणीत वडापाव आणि वाफाळलेला आलंयुक्त  चहा त्या थंडगार पावसात अधिकच मज्जा आणतो . 


No comments:

Post a Comment