Friday, July 28, 2023

निसर्गाला आव्हान

 निसर्ग ही परमेश्वराने दिलेली भेट आहे . बहरलेला निसर्ग कायम मनाला सुखावत राहतो . शहरात राहणारी लोक २ दिवस निसर्गाच्या सानिध्यात राहून आली ना , तरी त्यांना किती  फ्रेश वाटतं , हे त्यांना माहितीच आहे . निसर्ग कायम आपल्याला देत राहतो , पण जर आपणच निसर्गाला आव्हान दिले तर एकवेळ तो ही आपल्याला सोडत नाही . 

    सध्या मोठ्या प्रमाणावर चाललेली वृक्षतोड , डोंगरतोड , नदी बुझवणे अशी विघातक कामे ही मानवी विनाशाची चाहूल आहे . ग्लोबल वॉर्मिग हा ह्याचाच परिणाम आहे . बर्फ वितळू लागलाय, ह्याहून अधिक काय वाईट ! कधीही कोणत्याही वेळी पाऊस पडतो . अनियमित निसर्गचक्र , हे इतकं भयानक वास्तव अनुभवत असताना ही आपण याविरोधात का कोणी ठाम कृती घेत नाही.  निसर्ग तोडून बांधकाम चाललय , दिसले ना , तर टाका लगेच Social Media वर फोटो , व्हिडिओ ! त्यात जागेचे नाव टाका , होऊ दे viral - कळू दे जनतेला आणि तिथल्या राजकारणी व्यक्तींना की हे चुकीचे होतंय. पण जो पर्यंत आपण बोलणारच नाही , तोवर ही मनमानी अशीच चालू राहणार ! 

  

Wednesday, July 26, 2023

सद्गुरू पादांबुज

सद्गुरू हा समुद्रासारखा अथांग असतो.  त्यात आपल्याला च सामावून जायचे असते . सद्गुरू पादांबुजाला स्पर्श करताच तामसी वृत्तीचा नाश होऊन कैवल्य जागृत होते . मन संपूर्ण पणें निष्कृतीमय होण्यासाठी सद्गुरुंचे मानसपूजा नियमित करणे जरुरी आहे. मानसपूजा ही अत्यंत श्रेष्ठ असून त्यात मानसिकरीत्या असमसाहस प्रेमाने व्योमकेश त्रिविक्रम यास पाचारण करायचे . त्रिविक्रम भगवंताने च हे विश्व सृजिले आहे.

त्रिविक्रम हाच माझा सद्गुरू आणि माझा अनिरुद्ध .

मानसपुजेत अनिरुध्द यास स्नपन करावे आणि अजीजी करावी ,
" अनिरुद्ध देवा ,  मला अकिंचन ठेवू नकोस. तू सर्वविद आहेस . तुला माझ्या जन्म - जन्माची सय आहे. तू अनवरत पणे माझ्यावर प्रेम करतोस . म्हणूनच , हे सद्गुरू अनिरुद्ध राया - तुझ्या ह्या आत्मजाला सदैव तुझ्या पादांबुजा वरच राहू दे -
मला अनृणी कर - माझ्यातील
वोखटेपण काढून टाक.
हे सर्व काही तू केवळ तुझ्या एका भ्रुकुटी- लाघवातच करू शकतोस.

-
साचार वानर सैनिक
फक्त बापूंचा सिंह
राहुल सिंह गुरव
२०/०४/२०२०

सिमेंटचे जंगल ...

 घोडबंदर ठाणे येथील सिमेंटचे जंगल ... 


   आज सकाळी घोडबंदर रोड वरून जाताना हिरवाई कुठेतरी हरवल्यासारही वाटली . गेल्या १० वर्षात जे सिमेंटचे जंगल वाढले आहे , त्यातून जाताना खऱ्या निसर्गप्रेमी ठाणेकराला भरून आल्यासारखे नाही वाटले तर नवलच !

   ह्याला जबाबदार बिल्डर कडून पैसेखाऊ राजकारणी आहेत . मुळात राजकारण्यांच्या हाती सत्ता असते ; ती त्यांनी सत्कारणी तेव्हाच लागते जेव्हा ते त्या अधिकाराचा वापर आपल्या जनतेला , आपल्या जमिनीला , आपल्या निसर्गाला त्याचा हक्क मिळवून देतील किंवा किमान असलेला हक्क टिकवुन ठेवतील . 

घोडबंदर च्या निसर्गाची डोळ्यांची पारणे फिटणारी निसर्ग सृष्टी अनुभवायची असेल तर त्यासाठी भर पावसाळ्यात इथे यायला हवं . अहाहा , काय निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे ! पावसाळ्यात  ठाणेकरांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनात पूर्ण रिफ्रेश व्हायचं असेल तर लगेच बाईक वरून घोडबंदर रोड वर  एक फेर फटका मारून आल्यास दिवसभराचा क्षीण गेल्याचा अनुभव येईल . 

पावसाळ्यात , तुम्ही ठाण्यावरून कासार-वडवली सोडलं की हळूहळू तुम्ही निसर्गाच्या कुशीत शिरू लागता . पण न संपणाऱ्या लहान मोठी इमारती , त्यांची बांधकाम , मेट्रो ची बांधकाम इत्यादी ह्या पावसाळ्यात डोळ्यांना नकोश्या होतात , कारण ह्या सर्व गोष्टीमुळे नैसर्गिक सुंदरतेला तडा गेला आहे . पुढे जसजसं तुम्ही ओवळ्याला पोहचाल , तसतसं तुम्ही 90 % तरी निसर्ग मय झालेले असाल . 

आता इथे सरकारने खाडी शेजारीच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक कट्टा उभारला आहे आणि छान सोय सुध्दा केली आहे .  पण कितीही काहीही असलं तरी नैसर्गिक सौन्दर्य ते नैसर्गिक सौन्दर्यच !


ह्या लहानशा लेखातून मी आवाहन करत आहे , यंदाच्या वर्षी भर पावसात एकदा तरी घोडबंदर रोड ला नक्की भेट द्या . तिथे गावकऱयांनी लावलेल्या स्टॉल वर गरमागरम मॅग्गी चा आनंद नक्की घ्या . तसेच , झणझणीत वडापाव आणि वाफाळलेला आलंयुक्त  चहा त्या थंडगार पावसात अधिकच मज्जा आणतो . 


MI BABAN SARKHA HOIN

RUGVED BALA TUZE BABA , KHUP MEHNAT KARTIL
YASHACHE SHIKHAR GAATHUN KHUP NAAV KAMVTIL
TU MATRA TYANCHA ITKA LAADKA HOSHIL
BABAN SAARKH VHAYCHAY MALA , HE TU MHANSHIL


BABA MHANJE SUPERMAN
BABA MHANJE BATMAN
BABA MHANJE SPIDERMAN
BABA MHANJE HE-MAN
BABA NEHMI TUZYASATHI HERO CH ASTIL
BABAN SAARKH VHAYCHAY MALA , HE TU MHANSHIL



SUCCESS MILVTIL BABA
PAAY JAMNIVAR THEVUN
WORLD FAMOUS TUZE BABA
HOTIL SARVANCE FAVOURITE
BABA NEHMI TUZYASATHI ROLL-MODEL CH ASTIL
BABAN SAARKH VHAYCHAY MALA , HE TU MHANSHIL



MITRANSOBAT FIRAYLA NESHIL TU BABANA
MITRANSOBAT KHELAYLA NESHIL TU BABANA
BABA TUZE BEST FRIEND - TYACHYA PEKSHA KONI NAHI
SARV MANATLE BABAN PUDHE NEHMI VYAKT HOSHIL
 BABA NEHMI TUZYASATHI BESTEST FRIEND CH ASTIL
BABAN SAARKH VHAYCHAY MALA , HE TU MHANSHIL


TU AANI MI - MI ANI TU
DOGHE EKTRA NAHI JAR - KARMAT NAHI JARA PAN
ASHICH DHAMAL MAJJA KARU -LIFETIME SOBAT
PAHILI MITHI MAARLI TULA TEVHACH ZHALAS MAZA BESTEST FRIEND
KITIHI KAAM ASLE TARI........
 BABA NEHMI TUZYASATHI AVAILABLE CH ASTIL
BABAN SAARKH VHAYCHAY MALA , HE TU MHANSHIL



I LOVE YOU
RUGVED
22/7/2020
A3/103
RUGVED LA AAJ 3.5 MONTH CHE INJECTION DILE ......GHARI AALO TAR ZOPLA HOTA BARACH VEL . ACHNAK RADU LAAGLA .....UCHLUN GHETLE .....RUGVED KHAANDYAVAR DOK THEVUN , TYACHE HAAT MAZYA MAANEBHOVTI MITHI MAARLYASARKHE KARUN SHAANT ZOPLA , TYACHA HA ABOL VISHWAS MAZYAVARCHA PAAHUN  ....SAHAJ SUCHLELE GANE !!